Thursday, September 3, 2009

१४ जून गुरुवार. आज पहिल्याच तासाला आमची दांडी! आहे विषय म्हणोन काय रासायनीक सूत्रे तोंडपाठ असतात काय? हा प्रा.पिसे पिसाटच दिसतो. आज आमची सगळ्या वर्गासमोर फजिती! बघेन बघेन आणि पहिल्या वर्गात पहिल्या फटक्यात पास होऊन दाखविन. हि मिस साठे लग्न बिग्न करुन गेली की काय! आज तिसरा दिवस अजून दर्शन नाही. सोमण रोज चोपून कपडे करुन येतो हांsss बेट्या..सगळ फुकट गेलं म्हणायचं.

~~~~~****~~~~~

आज नानाकडे. पुस्तकासंबंधी आधि बोललो होतो त्याप्रमाणे त्याने स्टॅट आणि फ़िजिक्सचे पुस्तक आणि त्याच्या वह्या दिल्या.वेळेत परत करणेबाबत पुन्हा एकदा बोलून दाखवले.काय गरज होती? आम्ही काय ह्याची पुस्तके घेउन पळून जातो? जाउ द्या. दिवस वैर्‍याचे आहेत. समोरच्या कासटकर चाळीत आज काही गडबड दिसते! यंदाच्या पावसाळ्यात तरी चाळ दुरुस्त करा म्हणावं कासटकरांन! उद्याच भास्करची गाठ घेतो. नाही म्हटल तरी जवळचा दोस्त, काहीही अडचण असली तरी घरी ये म्हणायला हवं आज शेपूची भाजी. आधीच नावडती त्यात खारट!

~~~~~****~~~~~

कासटकर चाळीत दुरुस्तीचे काम सुरु. भास्करकडे चक्कर टाकली. तसा काही तो नीडफुल नाहिये अस म्हणाला. साला इंग्लिश बोलतो. कुठुन कुठुन शब्द तोंडावर फेकतो कोणास ठाउक. कांकी सामान उपशित होत्या. चाळीत रहायचं म्हणजे डोक्याला ताप. त्याबाबतीत आम्ही नशिबवानच म्हणायचे. छोट असल तरी मुंबईत स्वतःच घर म्हणजे चैनच की! आई, अण्णा मी सुध्या आणि बनी.. केसरीत दरवाढीची घोषणा. लेको, नविन काय सांगता तुम्ही?

~~~~****~~~~~

1 comment: