Saturday, August 29, 2009

दि. ११/६/१९५२, उद्या १२ जून. कॉलेज उद्यापसून सुरु होईल पण त्याची कालपासून तयारी करतोय. चप्पल दुरुस्त करुन आणल, सायकलच हॅंडल वाकड झालेल ते दुरुस्त केल. दिड रुपयांचा भुर्द्ंड बसला. हे शेटकर कुठेही पोती ठेवतात आणि ती नेमकी माझ्याच सायकलवर पडावित? जाऊ दे, त्यानिमित्यान सगळी सायकल नजरेखालून गेली हे बर झाल.
एवढी अर्धा तास सायकल हाणीत जायच मध्येच कांही झाले तर पुन्हा पायपीट! शर्ट ठेवलाय गादीखाली उद्यापर्यंत इस्त्री होईल. पहिलाच दिवस, अण्णांच घड्याळ घालुन जाईन. तस मित्रांना माहिती आहे म्हणा ते माझ नाहिये ते, पण सरसकट सगळ्यांना कुठे ठाऊक आहे? चला, लवकर झोपायला हवं. एवढी रोजनिशी लिहून होईतो सुरु झाल शेजाऱ्य़ांच गाणं. ही लोकं एवढी का भांडतात?

~~~~ *** ~~~~

आज पहाटे पाचाच्या ठोक्याला उठलो. कोपर्‍यावरुन दूध आणून टाकल. तोवर आईने घमेलीभर पाणी तापवून ठेवलेल. पावसाळ्यात कढत पाणी म्हणजे स्वर्गसुख! बाकीची आवराआवरी होईतो बनी उठली. हिची कायम मधे मधे लुडबुड असते. कालचा शर्ट इस्त्री झाला होता. कडक कपडे केले. मी धोतऱ्य़ा म्हणून वावरणार नाही म्हणून आधिच घरी स्पष्ट सांगितल म्हणोन बरं झाल. आज अंमळ ज्यास्तच फ़ुलपात्र भरुन चहा घेतला. शशीची वाट पहात बसलो. वाटल नेमका आज उशिर करतो की काय, पण साताच्या ठोक्याला आला.
आज कॉलेजात विशेष गर्दी दिसत नव्हती. मिस साठेही कुठे दिसली नाही. नारायण, सोम्या, विज्या सगळे भेटले. ह्या सोमणला एवढी गुळगुळीत दाढी करुन यायची काही गरज आहे काय? देवआनंद नंतर हाच! शिकवणी फारशी झाली नाही पण दोन पर्य़ंत कॉलेजातच होतो मग गप्पा आणि घर. संध्याकाळी पेपर वाचत बसलो. आज वेळ कुठे मिळालाय? उद्या पुस्तके बघायल हवीत. नानाची मिळतात का पहातो.

~~~~***~~~~

No comments:

Post a Comment